
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपूर :- आपल्या लेखणीने समाजातील चांगले वाईट याचे विश्लेषण निर्भिड पञकारीतेच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचे काम ग्रामीण भागातील पत्रकार करीत असतात. स्थानिक पातळीवरील अडचणी लेखणीद्वारे मांडण्यात पञकारांचा मोठा वाटा असतो.ग्रामीण भागातील प्रश्नावर लेखणीचा ठसा ऊमटवत सेवेचे व्रत अंगीकारणारा खरा योद्धा म्हणजे ग्रामीण पञकार असल्याचे प्रतिपादन स्वप्निल रणदिवे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारांचा सन्मान सोहळा स्वप्निल रणदिवे मित्रमंडळाच्यावतीने तुंगत याठिकाणी आयोजित करून त्यांना हेल्मेट भेट देण्याचा उपक्रम राबविला. यावेळी स्वप्निल रणदिवे बोलत होते.यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विठ्ठलचे संचालक महादेव देठे हे होते. यावेळी भिमाचे संचालक तुषार चव्हाण, माजी संचालक कालिदास रणदिवे, धनाजी घाडगे, तानाजी पाटील यांचेसह युवा नेते डॉ.पंकज लामकाने, ग्रा.पं. सदस्य औदुंबर गायकवाड, अमित साळुंखे, पंडित देठे, संजय रणदिवे, श्रीकांत अवताडे, महादेव रणदिवे, कुमार गायकवाड, माधव रणदिवे, अंगद रणदिवे, नेताजी सावंत, अक्षय पवार, डॉ.माने यांचेसह तुंगत, रोपळे, येवती, मगरवाडी, सुस्ते परिसरातील स्वप्निल रणदिवे मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्वप्निल रणदिवे म्हणाले कि, वृत्त संकलन करण्यासाठी मोटारसायकलद्वारे भटकंती पञकारांना करावी लागते. त्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण पत्रकारांचा सन्मान पत्रकारदिनी हेल्मेट भेट देऊन करण्याचा निर्णय आमचे सहकारी मित्रांनी घेतल्याचे रणदिवे यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण भागातील पत्रकार उत्तम बागल, किशोर काकडे, मोहन काळे, विठ्ठल जाधव, दादा कदम, विकास सरवळे, संतोष रणदिवे, संजय रणदिवे, रविंद्र शेवडे, नेताजी वाघमारे, सावता जाधव, चंद्रकांत माने, अंबादास वायदंडे, समाधान भोई, सुधीर आंध यांचा सन्मान प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. पंकज लामकाने यांनी केले तर पत्रकारांचे वतीने रविंद्र शेवडे यांनी मनोगत व्यक्त केले.