
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- नववर्षाची भेट म्हणून नुकतेच आघाडी सरकारने मुंबईतील 500 चौ.फुटाच्या घरांचे मालमत्ता कर माफ करण्याचे आदेश जारी केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी प्रशासनाने सुद्धा 500 चौ.फुटाच्या घरांचे मालमत्ता कर त्वरित रद्द करण्याचा ठराव घ्यावा व नागरिकांना दिलासा द्यावा. अशी जनतेमधून वारंवार मागणी होत असून,सध्यस्थितीत गेली दोन वर्षांपासून कोरोना महामारी व अतिवृष्टि, वादळी पाऊस, गारपीटिने व सतत लॉकडाऊनमुळे सामान्य जनतेचा रोजगार संपुष्टात आला आहे.
यामुळे सामान्य जनतेच्या उदर्निवाहची समस्या उत्पन्न झाली आहे.त्यातल्या त्यात नगर परिषद प्रशासनाची मालमत्ता कराची वसुली जोरात सुरू असून सामान्य नागरिकांची घर टॅक्स भरण्याची परिस्थिती सुद्धा नाही म्हणून ती वसुली थांबवावी तसेच गरीब व सामान्य जनतेला 500 वर्ग फूटच्या घर मालमत्तेची करमाफीचे शासनाने आदेश देऊन जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी समस्त अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नागरिकांच्या द्वारे प्रहार युवा संघटना दहिगाव रेचा यांच्या वतीने श्री.अभिजित जगताप तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांना निवेदना मार्फत यावेळी केली.
निवेदन देतेवेळी सुरज गोळे दहीगाव शाखा प्रमूख,जय ठाकरे विधानसभा प्रमुख,निलेश सोलकर सर्कल प्रमुख खटकाली, श्याम धुमाळे, शिवा खारोडे, आदेश शिंतोळे, स्वराज ढोले, सनी धुमाळे, सोपान तायडे, अनिकेत चिंचोलकर, आदित्य गोळे, ऋषी सोलकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.