
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- दिनांक 10 जानेवारी श्री निकेतन हायस्कूल, दिपक नगर, तरोडा (बु), नांदेड. येथील कु. अक्षरा सुनिल वाठोरे ही ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी भागातुन जिल्हा शिष्यवृत्ती धारक झालेली आहे. तिचे संस्थेचे सचिव मा के जी नरवाडे सर, सहसचिव मा.डॉ.सौ.एस. एन.राऊत मॅडम, हायस्कूलचे मुख्याध्यापक मा यशवंत थोरात सर व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि तिचे आई-वडील यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.