
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा भिवंडी :- स्थानिक संघर्ष समितीच्या माध्यमातून आज ( दि १०जानेवारी)रोजी महामार्गावर खड्डे भरो अभियान राबविण्यात आले गेली अनेक वर्षे भिवंडी,वाडा,मनोर रस्त्याला वाली नाही सर्व पक्ष, संस्था आणि संघटनांनी आंदोलनेही केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतेही दखल घेत नाही. प्रत्येक वेळी आश्वासने देत आहेत रोज शेकडो अपघात होत असतात. स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत असे असताना स्थानिक संघर्ष समितीने सर्व जनतेला आव्हान करून आज १० जानेवारी रोजी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले.