
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई :- अंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांच्या तक्रारीची दखल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. बिलांवर सह्या करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याबाबत कोकणे यांनी तक्रार केली होती. प्रकरणी कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी अभियंता कोकणे यांना संपर्क साधून त्यांच्यावर दबाव आणणाऱ्या व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. बीड जिल्ह्यात अधिकारी वर्गांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर अशा रीतीने दबाव आणायचे काम कोणी करत असेल, तो कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा असेल, त्याची गय केली जाणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.