
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड :- उत्तर मतदारसंघातील सुगाव बु. येथील शेतकरी कैलास भाऊराव हिंगमिरे यांनी कर्जास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. दि.10 रोजी सोमवारी आ.बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे, तलाठी शिवलिंग घंटोड, शिवसेनेचे प्रवक्ते माधव महाराज, सरपंच तानाजी फुलारी, कोंडीबा हिंगमिरे, माधव हिंगमिरे, चेअरमन बालाजी शिंदे, बालासाहेब भोसले, लक्ष्मण भोसले, संतोष भारसावडे, पांडुरंग शिंदे, मा. सरपंच देवराव हिंगमिरे, पोलीस पाटील विजय रावळे यांच्यासह आदीजण उपस्थित होते.
सुगाव बु. येथील कैलास भाऊराव हिंगमिरे यांना दोन मुले, एक मुलगी, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे. या घरातील कुटुंब प्रमुख कैलास हिंगमिरे होते. त्यांच्यावर दोन लाख रुपय बँकेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे हिंगमिरे कुटुंबीय अडचणी सापडले होते. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी त्यांना धीर देत, शासनाकडून मदत मिळवून देतो, असे आश्वासन दिले होते. सोमवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी एक लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला आहे. पुढील काळात देखील काही अडचण असेल तर मला सांगा मी आपल्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी असल्याचे आ. कल्याणकर यांनी आश्वासन दिले आहे.