
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व
प्रतिनिधी मोहन आखाडे
वोटर आयडी कार्ड अर्थात मतदान ओळखपत्र सरकारी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक डॉक्यूमेंट आहे. आता मतदान ओळखपत्र आपल्या मोबाईल फोनवरही डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर जाणून घ्या मतदान ओळखपत्र कसं डाउनलोड करायचं.
कसे करणार Voter ID डाऊनलोड?
•सर्वप्रथम डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी voterportal.eci.gov.in/ ही वेबसाईटवर ओपन करा.
•येथे एक अकाउंट बनवावं लागेल. त्यानंतर लॉग-इन करुन वेबसाईटवर दिसणाऱ्या e-EPIC या पर्यायावर क्लिक करा.
•नंतर e-EPIC नंबर किंवा रेफरेंस नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
• OTP सबमिट केल्यानंतर e-EPIC डाउनलोड करुन तुमचं डिजिटल कार्ड डाउनलोड करू शकता.
यादरम्यान, जर कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असेल, तर हे डाउनलोड करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता.