
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी / अरुण भोई
दौंड :- राजेगाव गणपती मंदिराच्या समोर दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब यांनी ग्रामस्थांना राजेगाव परिसरामधील सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामसुरक्षा दल तसेच गावामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या चोर्या यासाठी काय केले पाहिजेत तसेच कोरोना सारख्या महामारी वर कशाप्रकारे उपाय करणे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे. माहिती दिली तसेच स्वतःच्या आरोग्याकडे कशाप्रकारे लक्ष दिली पाहिजेत यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी राजेगाव मधील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ ग्रामपंचायत राजेगाव यांच्या वतीने केला.
यावेळी राजेगाव चे सरपंच प्रवीण लोंढे तंटामुक्ती अध्यक्ष राजेश राऊत,आपले मनोगत व्यक्त तसेच प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष रमेश शितोळे,यांनी आभार मानले यावेळी उपस्थित भीमा पाटस कारखान्याचे मा.संचालक शहाजी जाधव, मा.पंचायत समिती सदस्य नवनीत जाधव,पोलीस पाटील महेश लोंढे, माजी उपसरपंच बापूसाहेब चोपडे, मा.सोसायटी चेअरमन सुरेश कदम,सोसायटीचे सदस्य शहाजी गुणवरे, अमोल मोरे,ग्रामपंचायत सदस्य सोपान चोपडे, गणेश जाधव, राजेश्वर विद्यालय चे अध्यक्ष शिवाजी मोरे, पुण्यनगरीचे पत्रकार विठ्ठल मोघे, प्रभात पत्रकार अतुल काळदाते, विठ्ठल ढमे, अशोक जाधव, आक्रुण मोरे, मोरे, अमोल इंदलकर ग्रामपंचायत कर्मचारी निलेश चव्हाण व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.