
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
आज रोजी, अती दुर्गम अश्या सातपुडा परिसरातल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सोन खुर्द येथे काव्य गायण सोहळा व मार्गदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून युवा कवी साहित्यिक संतोष पावरा उपस्थित होते. याहा मोगी मातेचे प्रतिमा पूजन करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांनी आता पासूनच ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करायला हवे तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून लांबच राहिले पाहिजे शरीर, मन बुद्धि सुदृढ असेल तेव्हाच उच्च ध्येय गाठता येईल. असे प्रेरणादायी मार्गदर्शन सह खेड्यात राहता आश्रम शाळेत शिकता म्हणून काय झाले? आमु आखा एक से!,व्यसन, आदिम इतिहास क्रांती इत्यादी आपल्या कविता व पारंपरिक गीत, म्हणी, उखाणे स्व अनुभव सांगत उद्बोधन, प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित युवा कवी साहित्यिक संतोष पावरा यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आप. बी. सी. पावरा सरांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व व्यक्तीमत्व विकासाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे मुले मुली व शाळेचे सर्व शिक्षक टी. पी. पावरा, श्रीमती. पी. पी मतकरी (माध्य शि) श्रीमती के. बी पावरा (माध्य शि) श्रीमती. जयश्री लव्हाळे स्री अधिक्षीका श्री जी.जे पैठणकर (अधिक्षक) एस. बी. पावरा (प्राथ शि) एस. एस. कोणाले (प्राथ शि) व्ही. बी. पट्टेबहादुर (प्राथ शि) इत्यादी उपस्थित होते. आर.यु अहिरे यांनी सुत्रसंचालन केले तर आभार टी.पी पावरा सरांनी मानले.