
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चापोली :- दि 10जानेवारी वार सोमवार माजी बांधकाम व आरोग्य सभापती नारायणराव चाटे यांना बूस्टर दोस देऊन केला शुभारंभ
चापोली – केंद्र सरकारने 60 वर्षा वरील ज्या व्यक्तींनी दोन डोस घेतले आहेत व अशा व्यक्तिंना बूस्टर डोस देण्यास निर्णय केला असून लातूर जिल्ह्यात हा डोस चा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात चापोली येथे,चाकुर तालुक्याचे नायब तहसीलदार डॉक्टर काळे यांच्या उपस्थित करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीनिवास हसणाळे, वैद्यकीय अधिकारी चपे मॅडम, सह विविध मान्यवर उपस्थित होते. चापोली सुपुत्र माजी बांधकाम व आरोग्य सभापती डॉक्टर नारायण दौलतराव चाटे यांना पहिला बूस्टर डोस देऊन या तिसऱ्या बूस्टर डोस चा शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांनी जास्तीत जास्त 60 वर्षावरील नागरिकांनी तिसरा डोस घ्यावा असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले