
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
पेनुर :- लोहा तालुक्यातील पेनुर येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून व नांदेड जिल्हा परीषदेचे माजी सभापती संजय पा कऱ्हाळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान व नेञ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान व नेञ तपासणी शिबीराचे आयोजन दिनांक – १२-०१-२०२२ रोजी सकाळी १०:०० वा सुर्याई मेडिकल, विठ्ठाई क्लीनिक छञपती शिवाजी महाराज चौक पेनुर (मोठे) येथे करण्यात आले असुन या रक्तदान शिबीरात युवकांनी पुढाकार घ्यावा व नेञ तपासणी शिबीरात परीसरातील व्यक्तींनी नेञ तपासणी करावी असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक रामदास पा गवते, अध्यक्षस्थानी, गंगाधर पा गवते , बाळु पा गवते तर प्रमुख पाहुणे बाबाराव पा गवते , गुरुआप्पा धोंडे , बाळु पा गवते , सतिश पा गवते, डॉ डि एम लोकडे , डॉ कानगुले , आप्पाराव विठ्ठलराव लबडे , ज्ञानोबा पा गवते , संतोष पा लोखंडे , माधवराव चांदणे , डॉ बद्रिनाथ अंभोरे , मारोती एजगे , मारोती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन सदरील कार्यक्रमास उपस्थित राहावे व या दोन्ही शिबीराचा लाभ घ्यावा व आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.