
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.10 बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. वित्तीय कमाल मर्यादेत सर्वसाधारणसाठी 257.22 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 127.05 कोटी आदिवासी उप योजनेसाठी 14.66 कोटी रूपये
खचलेल्या,बुजलेल्या विहीरींसाठी रोहयोतून मदत द्यावी महावितरणने पेड पेंडींग जोडण्या देण्याची कार्यवाही करावी..
सन 2022-23 करिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना मिळून 398.93 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वसाधारण योजनेचा 257.22, अनुसूचित जाती उपयोजनेचा 127.05 व आदिवासी उपयोजनेसाठी 14.66 कोटी रूपयांचा त्यामध्ये समावेश आहे.समितीने प्रस्तावित केलेल्या आराखड्यातील कामे मंजूर करून विकास करण्यासाठी प्रयत्नशील रहावे…