
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारोती कदम
नांदेड :- कोरोनाच्या तिस-या लाटेला सामोरे जात असतांनाच कोरोनाचा फैलाव जलद गतीने होत असल्यामुळे कोरोनापासून संरक्षण मिळावे, या उदात्त हेतुने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वयोवृध्दांना तसेच फ्रन्टलाईन वर्कसनां बुस्टर डोस देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेवून, त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस आज मी घेतला असून, सर्वानी बुस्टर डोस घेवून कोरोना तिसऱ्या लाटेचा मुकाबला करावा, असे आवाहन नांदेड लोकसभा मतदार संघाचे खासदार.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोनाने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात दिवसात नांदेड जिल्हयात कोरोनाचा मोठया प्रमाणात उद्रेक सुरु झाला असल्यामुळे या कोरोनापासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रशासनाने 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींना तसेच फ्रन्टलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेवून, त्याची तातडीने अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. बुस्टर डोस घेण्यासाठी कोणतीही पुर्वनोंदणी प्रक्रीया करण्याची गरज नसून, जेष्ठ नागरीकांनी तातडीने बुस्टर डोस घेवून कोरणाचा मुकाबला करावा, असे आवाहन नांदेड जिल्हयाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
सोमवार दिनांक 10/01/2022 रोजी दुपारी 12.05 वाजता श्री.गुरु गोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रावर जावून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, डॉ.प्रमोद पाटील चिखलीकर, भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, डॉ.संतोष शिरसीकर, आरएमओ डॉ.साखरे, परिसेविका श्रीमती जाधव, परिचारीका श्रीमती वाघ, महानगर सरचिटणीस दिलीप ठाकूर, व्यंकटेश जिंदम आदींची उपस्थिती होती.