
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
मलकापूर :- दि.11 मलकापूर उपविभागीय पोलीस अधिकारी त्यागी साहेब यांनी मलकापूर एमआयडीसी परिसरात छापा मारून अवैधरित्या साठवून ठेवलेल्या शेकडो लिटर बायोडिझेलचा साठा जप्त केला होता. त्यासंदर्भात बातम्या प्रकाशित प्रदर्शित झाल्या होत्या. परंतु याप्रकरणी आरोपीवर काय कारवाई करण्यात आली या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी पत्रकार वसीम शेख यांनी संबंधित तहसीलदार यांना तीस डिसेंबर रोजी फोन करून माहिती घेतली.
त्यावर प्रयोगशाळेतील बायोडीजल नमुन्याचा अहवाल आल्यानंतर आरोपीविरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक तहसीलदार यांनी दिली.मात्र त्यानंतर सहा जानेवारी रोजी बुलढाणा येथील पत्रकार वसीम शेख आणि मलकापूर येथील पत्रकार गजानन ठोसर यांना मलकापूर येथील बायोडिझेल विक्रेता ऍड. इफ्तेखार शेख, मलकापूर मो.न.7218922030 नामक व्यक्तीने फोनवरून अश्लील भाषेत संभाषण करत हात-पाय तोडले जातील अशा प्रकारची धमकी दिली. त्यामुळे वरील दोन्ही पत्रकाररांच्या जिवित्वास लोकांत निर्माण झाला आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन व मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपी विरोधात तक्रारी दाखल करण्यात आलेले आहेत.
अलीकडच्या काळामध्ये पत्रकारांनी धमकावणे आणि त्यांच्यावर हल्ले करणे अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे त्यामुळे अशा वृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे.सदर आरोपी वरती संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने दिनांक 10 /1 /2022 रोजी नांदुरा पोलिस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले.या प्रकरणात न्याय न मिळाल्यास राष्ट्रीय विश्वरत्न पत्रकार संघाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नांदुरा यांच्या वतीने देण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे, नांदुरा तालुका अध्यक्ष अमर रमेश पाटील, तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव चिमकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे, तालुका सचिव महिंद्रा वानखडे, शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल, शहर उपाध्यक्ष नजीर रजवी, विजयानंद तायडे व इतर पत्रकार उपस्थित होते.