
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.11 स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सण,उत्सव, वाढदिवस, लग्न, टीव्ही आणि सोशल मीडीया यासारख्या विविध कार्यक्रमांना त्यागून वेळेचे नियोजन केल्यास यश प्राप्त करता येईल असा दृढ विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी ( IPS ) यांनी व्यक्त केला.ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.तामिळनाडूचे मुख्य सचिव सेवानिवृत्त विश्वनाथ शेगांवकर ( IAS) यांनीही ह्यावेळी मार्गदर्शन केले. तालुका महसूल विभाग व शेतकरी पुत्र अभ्यासिका यांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदुरा अर्बन बॅंकेच्या सभागृहात दि.८ जानेवारीला आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरूण पांडव, अध्यक्ष नांदुरा अर्बन बॅंक,न.प. मुख्याधिकारी आशिष बोबडे, पोलिस निरीक्षक भुषण गावंडे, साहेबराव जवरे,जेष्ठ संचालक नांदुरा अर्बन बॅंक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राहुल तायडे,संचलन अक्षय बोचरे व आभार प्रदर्शन हेमंत महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गावंडे,रोहित सोनोने,आयुष खंडेलवाल, विजय डवंगे, महेश चोपडे व विजय हिवरखेडे यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थितीत होते.