
दैनिक चालु वार्ता
माळाकोळी प्रतिनिधि
गणेश वाघमारे
लोहा :- लोंढेसांगवी येथे मारोती मंदिर येथे मारोतीरायांची मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रमाच्या निमित्त खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर साहेब लोंढे सांगवी येथील मंदिरात येवुन मारोतीरायांचे दर्शन घेऊन हनुमंत रायाला साकडे घातले कि जनजीवन व्यवस्थित होवू दे व ओमिक्राॅन व कोरोणाचे संकट जावु दे.
लोंढेसांगवी येथे भक्तिमय वातावरणात मारोती मंदिर कलशारोहन कार्यक्रम निमित्त मिरवणूक, भजन,कीर्तन, महाप्रसाद संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त सर्व गावातील व परिसरातून बरीच भक्त मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमात सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी सि.ओ.शिवाजीराव कपाळेसाहेब, माधवराव पाटील लोंढे,रंगराव पाटील लोंढे,सरपंच शंकर पाटील ढगे,सरपंच साईनाथ टर्के,लक्ष्मणराव बोडके,व गावातील लहान-थोर पुरूष महिला मंडळी उपस्थित होते, कलशारोहन व महाप्रसाद कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला गावकरी मंडळीच्या वतीने पिंटु पाटील लोंढे यांनी आलेल्या सर्व मान्यवर मंडळीचे आभार मानले