
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधिवडेपूरी
मारोती कदम
लोहा :- राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव कंलबर खु येथे कोरोणा नियमाचे पालन करुन दि.12जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्र माता जिजाऊ यांचा 424व्या जयंती निमित्त कंलबर खु येथील श्री क्षेत्र संत निव्रती महाराज श्री संत मोतीराम महाराज संस्थान येथे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवश्री गोविंदराव पा.घोरबांड तर उदघाटक उस्माननगर पो.स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डि देवकते असुन प्रमुख व्याख्याते शिवश्री पंडीत पवळे तर प्रमुख पाहुणे बाळासाहेब थोरे,प्राचार्य सदाशिव अंबटवार ,रावसाहेब भोपाळे,युवा उद्योजक नितीन लाठकर ,व्यंकटराव जाधव,संभाजी वडजे, सदानंद कांबळे, पत्रकार देविदास डांगे, गणेश लोखंडे, संगमेश्वर लांडग,आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील जिजाऊ भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.सुरेश घोरबांड, प्रल्हाद घोरबांड, माधव बोईनवाड,व्यंकटराव घोरबांड, गणपती काटेवाड,शेख शादुल,माधव घोरबांड, रामजी गायकवाड, बालाजी तेलंग, तिरुपती पा.घोरबांड, माधव कोटेवाड,आदी नी केले आहे