
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संकटापूर्वी पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन ” शिवसेनेचे भागवत पाटील सोमूरकर यांनी केली आहे . ओमिक्रोन हा नवा विषाणू राज्यात वेगाने पसरत आहे .त्यावर मात करण्यासाठी 3 जानेवारीपासून राज्यात सर्वत्र पंधरा ते अठरा वर्षांपर्यंतच्या तरूणांना लसीकरण करण्यात येत आहे , याचा या वयोगटातील , मुला मुलींनी स्वतः पूढाकार घेऊन न घाबरता आपले लसीकरण करून घ्यावे व इतरांना ही लसीकरण करून घेण्याकरता प्रेरित करावे . असे आवाहन शिवसेनेचे भागवत पाटील यांनी केले आहे.
देगलूर तालुक्यातील सर्व ,खेडे गाव, वाड्यावस्त्या, ताड्यांच्या विद्यार्थ्यांनी लसीकरण करून आदर्श सर्वांसमोर ठेवावा . प्रत्येक गावच्या लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध असुन लसीकरण करून घ्यावे. देगलूर तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांनी केंद्रावर जाऊन आपले लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.. तसेच ज्या ज्या अठरा वर्षांच्या पुढील नागरिकांनी अजून एक ही लसीकरणाचा डोस घेतला नाही , अशा नागरिकांनी ही लसीकरण पूर्ण करावे , असे आवाहन शिवसेनेचे भागवत पाटील सोमूरकर यांनी केले आहे.