
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- शहरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन महत्त्वाच्या विषयावर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
1)पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंजाबमध्ये उड्डाणपुलावर ताफा रोखून त्यांचा अपमान करण्याच्या निषेधार्थ.
2)देगलूर शहरात रात्रीच्यावेळी गोमातेची तस्करी करण्यात येत आहे त्या तस्करांना कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
देगलूर शहरात रात्रीच्या वेळी होणारीगो मातेची तस्करी रोखण्यात यावी व गुन्हेगारांवर कठोर शासन करण्यात यावे यासाठी आज उप विभागीय अधिकारी सचिन सांगळे सर व पोलिस निरीक्षक सोहन माचरे सर देगलूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजीराव कनकंटे (भाजप तालुका अध्यक्ष), अशोक गंदपवार (भाजप शहराध्यक्ष), प्रशांत दासरवार (भाजप गटनेता न.प.देगलूर), अशोक कांबळे (युवा मोर्चा शहर अध्यक्ष), सचिन पाटील, संतोष पाटील (सरपंच येरगी), चीलवरवार सर (शहर उपाध्यक्ष), बाबू भंडरवार, कैलास वंटे, गो रक्षक उमाकांत स्वामी, अवधूत शिंदे, शशांक चंद्रावार, शिवराज हांडे, मनीष पैलावार, निरंजन रायकवाड, शैलेश बोगुलवार, तुकाराम कोकने पाटील, भगवानराव विभुते, नरेश राचलवार, श्रीधर संगमकर, सौरभ गोपनवार, बालाजी पाटील थोटवाडीकर, सचिन कांबळे, ॲड श्रीकांत रेड्डी कोंपले, मल्लीकार्जुन पाटील, अझीम अन्सारी, बळीराम गवलवाड व अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.