
दैनिक चालु वार्ता
आटपाडी तालुका प्रतिनिधी
दादासो वाक्षे
आटपाडी :- सांगली जिल्ह्याचे राष्ट्रीय समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर आणि इतर पदाधिकारी यांनी आटपाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या सभागृहाला दिवंगत लोकनेते माजी सभापती धुळाजीराव झिंबल यांचे नाव द्यावे अशी विनंती आपल्या निवेदनातून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना केली. तसेच जर हा विषय मार्गी लागला नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी यावेळी दिला. निवेदन देताना उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर तसेच युवक सांगली जिल्हा अध्यक्ष उमाजी चव्हाण, सत्यजित गलांडे कालिदास गावडे, अरुण झंजे दत्ता मासाळ ,समाधान घुटुकडे, विशाल सरगर, विकास सरगर सचिन सरगर उपस्थित होते.