
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- कोविड अनुरूप वर्तन न करणे, आसन क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक आढळल्याने बंद करण्यात आलेल्या टाऊन सेंटर, सिडकोतील मेसर्स सात्विक फुड शाही भोज थाली आस्थापना प्रकरणाची जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्यासमोर आज सुनावणी झाली. सुनावणीत संबंधित आस्थापनेने कोविड नियमांबाबत स्वयंघोषणापत्र (अंडरटेकिंग) द्यावे.
नियमांचे उल्लंघन केल्याबाबत 15 हजारांचा दंड मनपा कार्यालयात जमा करावा. आस्थापना ११ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश श्री. चव्हाण यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत 6 जानेवारी रोजी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न केल्याने, आसन क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक आढळल्याने आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.