
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर शहरातील रामपूर रोड वर मोटरसायकल ज्या घटना वाढत असतानाच सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास देवदर्शना वरून घरी परत येते वेळेस महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीस्वरांनी पळवुन एका प्रकारचे देगलूर पोलिसांना आव्हान दिले. शहरातील रामपूर रोड भागात राहणाऱ्या शांताबाई सूर्यकांत पडलवार वय वर्ष 65 सोमवारी सकाळी हनुमान नगर येथील देवाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना रामपूर रोड वरील ब्रह्मकुमारी सेंटर जवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघांनी येऊन त्या महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे बाजार किंमत 64 हजार रुपये मिनी गंठण हिसकावून पळून गेले.
तत्पूर्वी या दुचाकीस्वारांनी दोन वेळा त्यांच्याच मागे पुढे फिरून त्यांचा अंदाज घेतला दरम्यान सदर महिलेच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे या महिलेचा मुलगा गोंदिया जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात 12/22प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक बसवराज जाकिकोरे अधिक तपास करीत आहेत. त्या वृद्ध महिलेला देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.देगलूर शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.देगलूर शहरातील माता-भगिनींना आव्हान करण्यात येत असून शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत.
त्यातत गल्ली,बोळी व मुख्य रस्त्यावरून जात असताना मोटर सायकल वरून पाठीमागून येऊन अचानक पणे गळ्यातले मंगळसूत्र दागिने पळवण्याचे रोज रोजचे प्रकार सरस चालू असून पोलीस यंत्रणा बघायची भूमिका घेत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला भगिनीना व शहर वासियांना दहशत व भिंतीचे सावट निर्माण झाले आहे तसेच न .पा देगलूर यांच्याकडून शहरवासियांचा सुविधा साठी संरक्षणासाठी शहरात बसविण्यात आलेली c.c.tv गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे . त्यामुळे महिला भगिनीना कळकळीचे विनंती करण्यात येते.तरी मेहरबान महिला व नागरीकानी सावधगिरी बाळगावी हि विनंती न.पा.नगरसेवक शैलेश उलेवार यांनी परिसरातील नागरिकांना आव्हान केले आहे.