
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नाशिक :- रविवार दि.09/01/2022 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात संस्थेच्या दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा संपन्न झाला. वर्ष 11 वे आपल्या सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिका काढण्याच्या संकल्पना मागचा उद्देश आपला एवढाच आहे की नांदेड जिल्ह्यातील आपल्या व्यवसायिक व सामाजिक राजकीय मंडळी चा संपर्क वाढवावा. एकमेकाशी ओळख व्हावी आपल्या सामाजिक संस्थेचे नाव प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या घरात असाव आणि आपण आपल्या नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिकेचे नाव वर्षाचे बाराही महिने आपल्या मनात राहून आपल्या घरात राहावे. या हेतूने या संकल्पनेतून आपल्या सामाजिक संस्थेचा दिनदर्शिका वर्ष 11वे आपण मोठ्या उत्साहाने शाखा नाशिक येथे संपन्न झाला.
उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून श्री.माधव रघुनाथ तेलंगे
(दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक) व तसेच नांदेड जिल्हा मित्र मंडळ प्रमुख सल्लागार शाखा नाशिक जगन्नाथ डांगे साहेब(उद्योजक) आनंद मुंडकर साहेब(ई.एस.आय) कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव पाटील कापसीकर (महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य) नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी महेश मामीडवार, (जिल्हा अध्यक्ष) निळकंठ शेवाळे(जिल्हा सल्लागार) नारायणराव शिंदे,(जिल्हा कार्याध्यक्ष)
प्रवीणजी डांगे,(जिल्हा संपर्कप्रमुख) मारोती घोरबांड,(जिल्हा सचिव)
जितेंद्र दिनकर,(जिल्हा सल्लागार) बंडू चींचोरे,(जिल्हा सह संपर्कप्रमुख) पांडुरंग वडजे,(जिल्हा उपाध्यक्ष) श्रीनिवास वड्डे(सोशल मीडियाअध्यकक्ष उमाकांत पांडागळे (जिल्हा सह प्रवक्ता) रघुनाथ गोरे, संजय सरोदे,सयाजी गंधलवाड आणि उपस्थित सर्व मंडळाचे सदस्य पदाधिकारी मान्यवर नाशिकातील सर्व नांदेडकर मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.