
दैनिक चालु वार्ता
नंदूरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असलेले काठी या गावात निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारी पथकाची कार्यवाही करण्यात आली, ती म्हणजे दिनांक 11-01-2022 रोजी मां.श्री.कांतीलाल उमाप साहेब, आयुक्त राज्य उत्पादक शुल्क महाराष्ट्र राज्य श्रीमती वर्मा मॅडम संचालक (अ व द ) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय आयुक्त माननीय श्री अर्जुन आवड साहेब श्री युवराज राठोड साहेब अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार काठी ते मोलगी रोड मोलगी शिवार ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे महिंद्रा कंपनीची मॅक्स तिचा परिवहन क्रमांक MH 39 C 4030 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये रॉयल ब्लू विस्की 180 मिली क्षमतेच्या एकूण 5000 बाटल्या (100 बॉक्स) दिसून आले. तेथे वाहनासह आरोपी नामे जयसिंग अंतर सिंग पाडवी 40 वर्ष रा. काठी ता अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या आरोपी इसमास अटक करण्यात आली असून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65 (अ) (ई),80,81,83,90,98(2),108, अन्वये करण्यात आली.
सदरची कार्यवाही श्री डी एम चकोर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार श्री रावते निरीक्षक श्री मेहता दू. निरीक्षक श्री बी एस चोथवे दुय्यम निरीक्षक, जवानश्री राजेंद्र पावरा, श्री हेमंत डी पाटील, श्री नितेश जेठे, अविनाश पाटील, श्री एम एम पाडवी, श्री संदीप वाघ, इत्यादींनी यशस्वीरित्या पार पडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री एस एस रावते निरीक्षक व विभाग नंदुरबार करीत आहे.