
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : किनवट
किनवट :- किनवट तालुक्यासह मागील काही दिवसात ढगाळ वातावरण पहायला मिळत होते अनेक भागात दिवसभरात कधी ढगाळ तर, कधी ऊन असे वातावरण दिसुन येत होते.परंतु, काही पहाटे ३ वाजताच्या सुमारास पावसाने गारपीठासह जोरदार मुसंडी मारली. ईस्लापूर, जलधरा , शिवणी, हुडी,कोसमेट, मुळझरा, भिसी, इत्यादी भागात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात येत असल्याचे परीसरातील शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे या पावसाने हरभरा, गहू , ज्वारी, तीळ, मक्का, आदी पिंकाना फटका बसला आहे अगदी तोंडावर आलेल्या तुरी चे खळे उद्धवस्त झाले आहे. काही पिके आडवे पडले आहेत. हरभऱ्याचे फुल गळून जात असल्याचे चित्र परिसरात दिसुन येत आहे.
यंदा तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न पाहिजे तेवढे झाले नाही. खरीप हंगाम वाया गेले असुन , त्याची उणीव भरून काढण्यासाठी भागातील शेतकऱ्याचे रब्बी हंगाम याकड़े लक्ष वेधले असुन हरभरा , गहू , ज्वारी, मक्का, इत्यादी पिकांची पेरणी केली आहे.परंतु अशा अवकाळी पाऊस व गारपीठ यामुळे पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . अशा अवकाळी पावसाचा सामना करणे कठीण झाले आहे.