दैनिक चालु वार्ता
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
प्रदिप मडावी
घूग्घूस :- दिनांक 30/12/2021 ला रात्री 9:30 वाजता दरम्यान मारोती मांढरे (23) रा. घुग्घुस हा दुचाकी क्र. एमएच 34 एएक्स 1477 ने वरोरा येथून घुग्घुसकडे घरी परत येत असतांना मुरसा गावाजवळ ट्रक क्र. एमएच 34 बीजी 2609 चा व दुचाकीचा अपघात झाला. यात मारोती मांढरे हा युवक गंभीर जखमी झाला.
गंभीर जखमी अवस्थेत मित्रांनी त्याला घुग्घुसला आणले व ही माहिती भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना दिली. त्यांनी लगेच रुग्णाकडे धाव घेतली डोक्याला गंभीर मार लागल्याने मारोतीची प्रकृती चिंताजनक झाली. डॉ. कोल्हे साहेबांच्या सल्ल्याने मारोती मांढरे याला विवेक बोढे सरांनी चंद्रपूर येथे डॉ. मेहरा यांच्याकडे उपचारासाठी भर्ती केले.
कुटुंबीयांकडे पैसे नसल्यामुळे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मांढरे कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत दिली.
मारोती यांचे वडील मासेविक्रीचा व्यवसाय करतात. आई मोलकरणीचे काम करते. गरिबीची परिस्थिती असल्याने पुढील उपचारासाठी लागणारा खर्च महागडा असल्याने मांढरे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत होते. दिनांक 30/12/2021 ते दिनांक 10/1/2022 पर्यंत डॉ. मेहरा यांच्या रुग्णालयात मारोती यांच्यावर उपचार सुरु होता.
ही बाब लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जोपासून भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकांशी चर्चा केली व रुग्णालयातील उपचाराचा खर्च मिळवून दिला. त्यामुळे मांढरे कुटुंबियांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त करत विवेक बोढे हे आमच्यासाठी देवदूत आहे, त्यांच्यामुळेच आमचा मुलगा वाचला असे मनोगत व्यक्त केले.