
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडजच्या परफेक्ट इंग्लीश स्कूलचा स्काॅलरशिपचा निकाल पुन्हा एकदा जिल्ह्यात परफेक्टच.पाचवी मध्ये 33 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 32 पात्र झाले यामध्ये शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत 19 विद्यार्थी आले, तसेच आठव्या वर्गाच्या 30 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत या वर्षी पाचवीचे 19 व आठवीचे 11एकूण 30 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.आतापर्यंत शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत 112 + कोरोणा काळातील30=142 विद्यार्थी झळकले आहेत.
तसेच आतापर्यंत नवोदय विद्यालयासाठी 50+कोरोणा काळातील 8वी चे 4विद्यार्थी, 5 वी चे 4 विद्यार्थी एकुण नवोदय विद्यालयासाठी 58विद्यार्थी व सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी 21 पात्र झाले आहेत यावर्षी ही पाचवीच्या वर्गातील तालुक्यात 27शिष्यवृत्ती धारक झाले आहेत त्या पैकी परफेक्ट इंग्लीश स्कूल चे 19 विद्यार्थी तर आठवी वर्गातील तालुक्यात 18विद्यार्थी त्या पैकी 11 विद्यार्थी परफेक्ट इंग्लीश स्कूलचेच.तसेच कंधारचे गटशिक्षणाधिकारी साहेब संजय येरमेसर ,पेठवडज बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास व्होनधरणे सर, सतिश व्यवहारे सर, केंद्र प्रमुख मोरे सर, विरभद्र दत्तात्रय जाधव सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे परफेक्ट इंग्लीश स्कूल पेठवडज यांच्या तर्फे अभिनंदन केले.