
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी/ अरुण भोई
भिगवण :- भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या यावेळी दर्पण बाळशास्त्री जांभेकर,यांच्या प्रतिमेचे पुजन करुण .वक्तृत्व स्पर्धे तील विजेत्यांना पारितोषिक तर समाजांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पारितोषिके मिळाल्यानंतर विदयार्थी हरखले तर सन्मानपत्र मिळालेल्या व्यक्ती व संस्थांनी समाधान व्यक्त केले.
येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने दौंड, इंदापुर व बारामती तालुक्यातील १६ विदयालयांमध्ये पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतल्या होत्या. वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना सन्मानपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन येथील तारादेवी लॉन्स येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार होते.
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डि. एन. जगताप, कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, सरपंच तानाजी वायसे, माजी उपसरपंच शंकरराव गायकवाड, संपत बंडगर, संजय रायसोनी, सचिन बोगावत, विजय सोनवणे, सुरेश पिसाळ, तुषार क्षीरसागर, डॉ. जयप्रकाश खरड, अण्णासाहेब धवडे, केशव भापकर, डॉ. अमोल खानावरे, देवानंद शेलार, दिनेश मारणे उपस्थित होते. १६ शाळांमधील लहान गट व मोठ्या गटातील ३२ विदयार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले तर पत्रकारितेतील योगदानाबद्दल जेष्ठ पत्रकार तानाजी काळे, ग्राहक संरक्षणातील योगदानाबद्दल तारादेवी लॉन्स तुषार झेंडे-पाटील, व्यसनमुक्तीतील कार्याबद्दल रमेश शितोळे-देशमुख यांना तर सामाजिक योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवण, सायकल क्लब ऑफ भिगवण व नेचर फाऊंडेशन या संस्थाना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पत्रकार संघाच्या उपक्रमाबद्दल शाळांनी व सामाजिक कार्याची दखल घेऊन सन्मानपत्र प्रदान केल्याबद्दल सन्मानपत्र प्राप्त व्यक्ती व संस्थांनी समाधान व्यक्त केले व यामुळे सामाजिक काम करण्यास उर्जा मिळेल अशी भावना व्यक्त केले. प्रास्ताविक पत्रकार डॉ. प्रशांत चवरे यांनी, सुत्रसंचालन नवनाथ सावंत व सागर जगदाळे यांनी तर आभार प्रदर्शन विजयकुमार गायकवाड यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पत्रकार संघाचे संस्थापक सुरेश पिसाळ, उपाध्यक्ष विठ्ठल मोघे, विजय गायकवाड, सचिव तुषार क्षिरसागर, सहसचिव महेंद्र काळे, खजिनदार आकाश पवार समन्वयक सोनवणे, नारायण संतोष मोरे, गणेश जराड, अप्पासाहेब मेंगावडे, डॉ. सुरेद्र शिरसट, अतुल काळदाते, प्रविण अंबोधरे, अरुण भोई, योगेश चव्हाण, गणेश चोपडे, अप्पासाहेब गायकवाड, विजयकुमार गायकवाड, सागर घरत, सागर जगदाळे, इरफान तांबोळी, प्रा. तुषार वाबळे, विजय कुताळ, शैलेश परकाळे, सचिन राजेभोसले आदींनी परिश्रण घेतले