
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पुर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
जय भगवान सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व संत भगवान बाबा स्मृती मंदिर उत्सव समिती मांडवे ता खटाव जिल्हा सातारा यांच्या तर्फे यावर्षीचा जय भगवान सेवारत्न पुरस्कार ‘धनराज विक्रम गुट्टे’ यांना जाहिर. अखिल भारतीय वंजारी युवा संघटन चे अध्यक्ष तथा क्षेत्रीय रेल्वे सल्लाग़ार समितीचे सदस्य धनराजभाऊ गुट्टे हे नाव तसे सर्वाना सुपरिचित आहे कारण जेथे जेथे अन्याय झाला तिथे तिथे हे धनराज गुट्टे या नावाची तोफ धडाड़ली आणि नुसतीच धडाडिलच नाही तर ज्या मागणीसाठि त्यांनी आवाज उठलवा त्याच आवाजाने ती मागणी पूर्ण करून दाखवून धनराजभाऊ यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
गेली 14-15 वर्षापासून अखिल भारतीय वंजारी युवा संघटनच्या माध्यमातून त्यांनी सबंध महाराष्ट्रच नाही तर अन्य राज्यातही काम केले आहे समाजसेवेचा वसा हाती घेतल्यानंतर सुरुवतीच्या काळात अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागला मागे हटतील ते धनराजभाऊ कसे ? उलटे आणखी जोमाने पेटून उठून ते लढत राहिले ज्यामधे लातूर जिल्हा परिषद मधे अनेक NT प्रवर्गातिल शिक्षक बाँधवांच्या बदलिला नियमात बदल करून जानीवपूर्वक अडथळा आणला जात होता.
त्यावेळी धनराजभाऊ यांनी जिल्हा परिषदेला कुलुप ठोकले पन तरीही प्रशासन दखल घेत नाही यामुळे जिल्हा परिषद येथे अंडे फोडून निषेध केला ज्याचा परिणाम म्हणून जिल्हा परिषदेने तात्काळ त्यावर निर्णय घेत शिक्षक बांधवाच्या बदली केल्या तसेच विद्यार्थी मित्रांच्या समांतर आरक्षणामुळे बरेच परिक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊनही सेवेत रुजू करून घेतले जात नव्हते त्यावेळी नागपुर अधिवेशनात आमरण उपोषणाला बसून सरकारचा निषेध केला पन सरकार याने जागे होत नाही हे लक्षात येताच आपल्या स्टाइल ने आंदोलन करत नागपुर अधिवेशनात गादया जाळुन सरकारचा निषेद केला.
ज्यामुळे सरकारला यावर विचार करने भाग पडले यावेळी पोलिसांनी धनराजभाऊ आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले तरीही धनराजभाऊ मगे हटले नाहित त्यानंतर Mpsc कडून जाहिर झालेल्या जाहिरातीत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे कळताच आजपर्यंत मुंबई येथील MPSC कार्यालयात अंडे फोडून व बोर्ड ला काळे फ़ासुन निषेध केला ज्याचा परिणाम म्हणून Mpsc बोर्डाने अन्याय दूर करत 18 जागा वाटप केले पन याचवेळी धनराजभाऊ व इतर 5 सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला ज्यामुळे सर्वाना जवळपास 2 दिवा5 तुरुंगवास भोगावा लागला पन आजही त्या प्रकरणात त्या सर्वाना कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात पन त्याची कसलीच तमा न बाळगता धनराजभाऊ आजही विविध मागण्यासाठि रस्त्यावर उतरत असतात.
ज्याचे उदारण म्हणजे आत्ताच काही दिवसांपूर्वी महाज्योति अंतर्गत काही विद्यार्थ्याना शिष्यवृत्ति मिळणार होती पण इतर विद्यार्थ्याना मात्र काहीच मिळणार नव्हते जयमुळे या मागणीला मंत्री महोदया सोबत बसून इतर सर्व विद्यार्थ्याना शिष्यवृत्ति मिळवून देत हा प्रश्न मार्गी लावला , एवढंच नाही तर विशाल हंगे नामक एका युवकाला त्याच्या वरीष्ठ अधिकार्याकडून त्रास दिला जात असल्याने त्या युवकाने आत्महत्या केली त्यावर आवाज उठवत लॉकडाउन असतानाही प्रशासनाला आत्मदहना चा इशारा देत आरोपिना अटक करायला भाग पाडले.
त्यावेळीहि कायदा सुव्यवस्था बिगडवल्या च्या कारनास्तव पोलिसांकड़ून त्यांना अटक झाली पन तरीही भाऊ मागे हटले नाहित ,त्याचप्रमाणे मुंबई येथे स्टेशन वरील हमालांच्या पोटावर अन्याय होत असल्याच्या कारनास्थव आवाज उठवत सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीत सळो की पळो करून सोडले असे अनेक काम धनराजभाऊ करत आलेत आणि याच कामाच कौतुक म्हणून जय भगवान सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व संत भगवान बाबा स्मृती मंदिर उत्सव समिती मांडवे ता खटाव जिल्हा सातारा यांच्या तर्फे यावं वर्षीचा जय भगवान सेवारत्न पुरस्कार , जाहिर झाला आहे येत्या 18 जानेवारी 2022 रोजी हा पुरस्कार वारकरी सांप्रदायिक मान्यवरांचे हस्ते देण्यात येणार आहे तरी समस्त मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन