
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा.मिलिंद खरात
वाडा तालुका :- आज पि. जे. हायस्कूल व आनंद लक्ष्मण चंदावरकर कनिष्ठ महाविदयालयात राजमाता जिजाऊ (माँ साहेब) व स्वामी विवेकानंद यांची जयंती कोविड च्या नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. त्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. आर. एस. पाटील सर यांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना हार व पुष्प अर्पण केले. यावेळी आ. ल. च. क.महाविदयालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री. बी. डी. मोरे सर, पर्यवेक्षक श्री. बी. के. पाटील सर, श्री. हडकमोड सर उपस्थितीत होते. या शिवाय महाविदयालयातील प्राध्यापक बंधू- भगिनी. व पि. जे. हायस्कूल मधील सर्व शिक्षक बंधू- भगिनी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ.श्रेया ठाकरे मैडम व सहकारी शिक्षकांनी केले