
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
उमरा :- पिंपळदरी ता. लोहा जि. नांदेड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतिनिधी श्री. संतोष देवराव पा. जाधव यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन्ही महान विभूती विषयी सविस्तर माहिती दिली. ग्राम पंचायत सदस्य श्री. तुकाराम जाधव, उपसरपंच शंकर कटवड, सदस्य तुकाराम जाधव,तपोवन जाधव,पोलीस पाटील गावातील तरुण व जेष्ठ नागरिक, ग्राम पंचायत सदस्य, महीला, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.