
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड (दिनांक. १२ जानेवारी) :- श्री निकेतन हायस्कूल, दिपक नगर, तरोडा (बु), नांदेड येथे राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी जयंती व स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मा यशवंत थोरात सर व श्रीमती सोनवणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक मा यशवंत थोरात सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत व्हनशेट्टे यांनी केले तर आभार शिवाजी माळेगावे यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.