
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादा लोखंडे
रांजणगाव :- शे.पूं.दि. १२ जानेवारी श्री शिवाजी विद्यालयात राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिलकुमार घारुळे सर होते. याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रमा आडे यांना सौ सरोज पवार यांच्या हस्ते जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मैंद सर, श्रीमती पवार मॅडम, शालेय समिती सदस्य श्री केशव पाटील नंदनवनकर यांचाही सत्कार करण्यात आला.श्रीमती रमा आडे यांनी सत्काराला उत्तर देताना संस्थेचे शाळेचे ॠण व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना श्री अनिलकुमार घारुळे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सत्कार मूर्तीचा परीचय सविता गोसावी यांनी केला तर वैशाली सपकाळ यांनी सुत्रसंचालन केले तर आभार ज्योती भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दिलीप पाटील, सुरेश सुलताने,अनिल भांड, भगवान वनारसे,संतोष बंडेवार, विजयसिंग परदेशी, आशा सांळुके, दादासाहेब हजारे,सतीश जावळे, ताराबाई हावरगे यांनी परीश्रम घेतले.