
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड :- नांदेड येथील श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज मध्ये आजराजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड सर यांनी दोन्ही प्रतिमेना पुष्पहार अर्पण केला त्यावेळी प्राध्यापिका दीपा जामकर यांनी राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राला शुरविर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्राला जन्म दिला असे सांगत सर्वधर्मसमभाव आणि परस्त्री मातेसमान अशी शिकवण शिवाजी महाराजांना दिली.
आजच्या मुलींनी जिजा मातेची प्रेरणा अंगीकारावी असे सांगत आजच्या तरुण पिढीने स्वामी विवेकानंद यांचे गुण अंगीकारावे व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे त्या म्हणाल्या त्याप्रसंगी कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे सर परीक्षा प्रमुख प्रा. मुरली घोरबांड सर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा स्वाती कानेगावकर मॅडम प्रा यान भुरे प्राध्यापक राठोड सर प्राध्यापक दहिवडी सर प्राध्यापक देशमुख सर प्राध्यापक पतंगे सर शाळेचे उपमुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे सर शाळेचे पर्यवेक्षक सदानंद नलगे सर यांच्यासह कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते