
दैनिक चालु वार्ता
मिरज तालुका प्रतिनिधी
पोपट माने
मिरज तालुका मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे
मिरज :- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.५वी) जिल्हा गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीतील तब्बल सात विद्यार्थ्यांची निवड झाली आणि ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार आज जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
1) हर्षवर्धन संदीप पाटील गुण :- 266
2) विश्वजित विठ्ठल सुतार गुण :- 254
3) प्राजक्ता प्रशांत पाटील गुण :- 246
4) सुदर्शन माणिक पाटील गुण :- 244
5) हर्षदा प्रमोद तांदळवाडे गुण :- 236
6) सौख्या मयूर तळंदगे गुण :- 232
7) भक्ती पांडुरंग खटावे गुण:- 228
शाळेचे मुख्याध्यापक श्री.किरण गायकवाड सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर रणदिवे , शिंदेवाडीचे उपसरपंच श्री.संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील महादेव लवटे एकुण पट 242 असुन यांच्या मध्ये सात मुला मुलींच्या गुणवत्ता चांगली असल्याने मिरज तालुका मध्ये कवतूक होत आहे यांच्या हस्ते सर्व गुणवत्ता धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री.सुनील मगदूम सर यांचा सत्कार करण्यात आला.