
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार:- जव्हार मधील एकमेव अशा धर्मवीर आनंद दिघे चौकात गेल्या वीसवर्षा पासून साजरा होत असलेल्या माघी गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी एकविसावे वर्ष असून हे वर्ष महिला शक्ती म्हणून साजरे होणार आहे.यानिमित्ताने रविवारी संध्याकाळी सात वाजता शनी मंदिरात नवीन कार्यकारिणी बाबत बैठक घेण्यात आली.
या बैठकी दरम्यान यावर्षी संपूर्ण हा माघी गणेशोत्सव महिलावर्ग सांभाळणार असल्याचे बैठकी दरम्यान ठरले.दरम्यान अध्यक्षपदी प्रियंका घोलप,उपाध्यक्ष सान्वी नवले,सचिव मनिषा वानी,सहसचिव भक्ती राऊत,खजिनदार आशावरी घोलप,सहखजिनदार मानसी वाणी अशी कार्यकारणी स्थापन करण्यात आली असून यावर्षी होणारा माघी गणेशोत्सव या कार्यकारिणीच्या देखरेखीखाली होणार आहे.
या उत्सवादरम्यान इतर सांस्कृतिक कार्यक्रम न घेता केवळ आरोग्य शिबिर व वीस वर्षापासून अखंडित चालू असलेल्या रक्तदान शिबिर घेण्यात येईल.या उत्सवावेळी शासनाने आखून दिलेल्या कोविड-१९ नियमांच्या चौकटीत राहून सर्व नियम पाळून यावर्षीचा उत्सव साजरा करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्षांनी यावेळी सांगितले.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होत्या.