
दैनिक चालु वार्ता
भूम तालुका
प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील भोगलगाव येथे राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त व अखंड हरिनाम सप्ताह ग्रामपंचायत कार्यालय भोगलगाव यांच्या मार्फत भगवंत रक्तपेढी यांचे रक्तदान शिबिराचे आयोजन केले . रक्तदान शिबिराचा प्रारंभ मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.या शिबिरात 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी सरपंच वैभव गायकवाड,उपसरपंच बिभीषण काळे, विठ्ठल काळे,बापूराव दहिवाळ किशोर काळे, निलेश खवळे ,विमल हनुमंत गायकवाड ,भारत गायकवाड, ऋषिकेश देवकर ,विठ्ठल काळे,श्रीकृष्ण घोडके प्रवीण कर्णवर ,महेश गिरी,केशव देवकर समाधान काळे,आश्रुबा काळे,वैभव कोळेकर,महेश देवकर,विशाल देवकर, कुंडलिक उत्तरेश्वर गायकवाड, अनुप कुमार फळे,परमेश्वर होके अशोक काळे, गणेश करणवर आदी ग्रा.सदस्य सही नागरिक उपस्थित होते.