
दैनिक चालु वार्ता
जांब सर्कल प्रतिनिधी
किरण गोंड
खुर्द :- दिनांक:-१०/०१/२०२२ रोजी जि प प्रा शाळा जांब खुर्द येथे मागील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे covid-19 चे सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या निर्देशानुसार पालकसभा घेऊन नवीन शालेय व्यवस्थापन समिती पुर्नगठित करण्यात आले. प्रथमतः सर्व पालकांची उपस्थिती नोंदवून प्रत्येक पालकास मास्क, सॕनिटायझर व पाणी बाॕटल वाटप करण्यात आले पालक सभेमधून चर्चा करून सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समिती मध्ये घेण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संवर्गनिहाय नावे सूचित करण्यात आली व घोषित करण्यात आली एकूण तेरा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. यात नऊ पालक, एक शिक्षणप्रेमी नागरिक, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शिक्षक प्रतिनिधी व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांची नावे घोषित करण्यात आले सदरील घोषित नऊ पालक सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली सदरील कार्यक्रमास ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी श्री माधवराव होणराव व उपसरपंच श्री. जयवंतराव पाटील व पालक