
दैनिक चालु वार्ता
लोणखेडा सर्कल प्रतिनिधी
हिम्मत बागुल
नाविन्य गटाची ओरिसा राज्य सरसमध्ये उत्कृष्ट कामगीरी
नाविन्य महिला स्वयं सहाय्यता गट लोणखेडा या गटातील सीमा योगेश पाटील या ताईची गटाच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार श्री.रघुनाथ गावडे, मा.श्री.राजेंद्र पाटील (प्रकल्प संचालक) जि.प.नंदुरबार मा.श्री. राघवेंद्र घोडपडे (गटविकास अधिकारी पंचायत समिती,शहादा), मा.श्री.यशवंत ठाकूर (जिल्हा अभियान व्यवस्थापक, नंदुरबार) मा. श्री. ईश्वर जगदाळे (तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती, शहादा) यांच्या मार्गदर्शनाने दि.२७ डिसेंबर २०२१ ते 06 जानेवारी २०२२ रोजी भूनेश्वर ओरिसा राज्याअंतर्गत सिसिर सरस आयोजित करण्यात आले होते.
या ठिकाणी नाविन्य गटास जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. याठिकाणी १० ते ११ दिवस नाविन्य गटाने रोस्टेड खाद्यपदार्थ विक्री केली व याठिकाणी विक्रीच्या माध्यमातून अडीच ते तीन लाखापर्यंत उलाढाल होऊन एक लाखाच्यावर त्यांना नफा देखील मिळाला. आयोजित सरस प्रदर्शनात त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले व यासाठी त्यांना त्याठिकाणी उत्कृष्ट सेल्समनशिप म्हणून गौरवण्यात आले.
या कामगीरीमुळे या समूहाचा सर्व सदस्यांची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर अतिरिक्त संचालक, श्री.परमेश्वर राऊत यांच्यासह राज्य व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व अशाप्रकारे गेल्या चार वर्षात त्यांनी 15 ते 16 लाखापर्यंत उलाढाल करून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून 8 ते ९ लाखापर्यंत नफा देखील कमविला आहे. व आज देखील त्या घरूनच मोठमोठ्या होलसेल विक्री करण्यासाठी ऑडर घेत असतात. व तालुक्यात जिल्ह्यात देखील त्यांच्या रोस्टेड पदार्थांचा मोठ्याप्रमाणात मागणी आहे.