
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- पारनेर तालुक्यातील २७ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा खोल्या नवीन इमारत बांधकाम करण्याकरिता २ कोटी ५७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती कृषी व बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिली. पारनेर तालुक्याला प्राथमिक शाळा खोल्या बांधकाम करण्याकरिता ऐवढ्या मोठ्या प्रमाणात निधी पहिल्यांदाच मिळाला असल्याचे ही सभापती दाते सर यांनी सांगितले लवकरच या शाळा खोल्यांचे भूमीपूजन करणार असून त्याचे कामही सुरू होऊन अद्यावत इमारती पूर्ण होईल असे सभापती दाते यांनी सांगितले.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी (देसवडे) १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जुले हर्या २ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडळी तर्फे कान्हुर ४ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनगर(तिखोल) १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी हवेली २ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवाडी (लोणी हवेली) १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुगेवाडी १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरोडी १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही ३ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देविभोयरे २ शाळा खोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडूस १ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवळदरा २ शाळा खोली,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे खुर्द ३ शाळा खोली अशा २७ शाळाखोल्या इमारतींचा समावेश आहे.