
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा :- दरवर्षीची पाणी टंचाई आणि त्यासाठी वाढत असलेली टॅंकर संख्या याबाबत पाणीटंचाई आधीच उपाययोजना व्हायला हव्यात यासाठी सगळ्याने कंबर कसली पाहिजे. या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी लोकांची तहान भागविण्यासाठी वाट्टेल ते करा पाणीपुरवठयाची कामे शाश्वत करा हवी ती मदत मी करेन असे प्रतिपादन विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी मोखाडा पंचायत समिती कडुन घेण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखडा बैठकीत भुसारा बोलत होते. यावेळी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायती निहाय सध्याच्या पाणीपुरवठा योजना तसेच लोकांच्या पिण्याच्या पाणी बाबत करावयाचा उपाययोजनांचा आढावा भुसारा यांनी यावेळी घेतला.
दरसाल मोखाडा तालुक्याला मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागते अशा वेळी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणीपुरवठा योजनांवर खर्च होवूनही टॅंकरची संख्या कमी होत नसल्याबाबात भुसारा यांनी नाराजी व्यक्त केली यामुळे खरतर पाणीपुरवठाची कामे ही चांगल्या दर्जांची आणि शाश्वत व्हायला हवी अशा सुचना केल्या ज्या वर्षानुवर्षे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आहेत त्या या उन्हाळ्याच्या आधी पुर्ण करा अन्यथा दोषींवर कारवाईचा ईशारा दिला आहे मोखाडयातील बेरीस्ते चास गोमघर या कोट्यवधी रुपयांच्या योजना आजही ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसून हलक्या दर्जाच्या पाईपलाईन मुळे लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे यामुळे पाणीपुरवठा योजनासाठी कोट्यवधी रुपये खर्चूनही जर पुन्हा टॅंकर लावावे लागत असतील तर हे नक्कीच भूषणावह नसल्याचे भुसारा यांनी सांगितले.
यावेळी शासनाकडुन घेण्यात येणारे बोअरींगची मर्यादा फक्त २०० फुट असल्याने बऱ्याच बोअरींगला पाणी लागत नाही यामुळे याची खोलीची मर्यादा वाढविण्याची मागणी यावेळी ग्रामसेवकानी केली याबाबत खोलीची मर्यादा वाढवून देण्याबाबत सरकारी दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे भुसारा यांनी सांगितले.यावेळी पाणी टंचाई मिटवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून पाणी टंचाईचा कलंक पुसण्यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागा असे आवाहनही भुसारा यांनी यावेळी केले.यावेळी सभापती आशा झुगरे, जिप सदस्य कुसुम झोले,उपसभापती लक्ष्मी भुसारे,पस सदस्य प्रदिप वाघ नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी संगीता भांगरे,सर्व पाणीपुरवठा अधिकारी आणि ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.