
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
आई वडीलांची सेवा आणि जिवनात संघर्ष हा लाख मोलाचा संदेश शिवाजी साठे सरांनी दिला
माकणी :- लोहारा तालुक्यातील माकणी येथे दि 11-1-2022 रोजी कार्यक्रम कोविडच्या साथीचा फैलाव लक्षात घेता पुरेपूर काळजी घेऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गया फाऊंडेशनचे माकणी येथील सदस्य श्री कृष्णात साठे, प्रमुख मार्गदर्शक श्री शिवाजी साठे, आदर्श शिक्षक श्री गौरीशंकर कलशेट्टी तसेच प्राथमिक शिक्षक श्री गणेश गोरे, हणमंत क्षीरसागर, भानुदास कांबळे, अविनाश कांबळे,गयाबाई शिंदे, भारताबाई जाधव, पत्रकार गणेश मुसांडे आणि आयसीड संस्थेचे कार्यकारी संचालक महेश शिंदे उपस्थित होते.
‘राजमाता जिजाऊ यांनी अथक परिश्रम घेऊन स्वराज्याचा पाया रचला आणि शिवाजी राजांनी स्वराज्य उभे केले, राजमातेचा आदर्श समाजातल्या प्रत्येकाने घेऊन आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली पाहिजे. तसेच युवकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वागायला पाहिजे’ असे प्रतिपादन कृष्णात साठे यांनी केले.
करुणा जाधव, वैष्णवी क्षीरसागर, सोनाली कांबळे,वैभव मिसाळ, आयुष जाधव, शकील सय्यद, समीर वाघमारे, संतोष शिंदे, लक्ष्मी शिंदे, दिग्विजय कांबळे, वैभव चौरे, प्रतिक्षा वाघमारे, रोहित वाघमारे आदी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शिंदे यांनी केले आणि आभार प्रदर्शन लक्ष्मी शिंदे या विद्यार्थीनीने केले