
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
नांदेड :- कृषी विभाग व पशू सवर्धन विभाग जिल्हा परिषद नांदेड तर्फे उत्कृष्ट गोशाळा व आदर्श शेतकरी व गोव्यवस्थापना बद्दल आमच्या राधेय सामाजिक संस्था संचलित, राधेगोपाल गोवर्धन व गोसेवा प्रकल्प काठेवाडी यांना मिळाला. माननीय श्री अशोक चव्हाण साहेब ( सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री नांदेड) यांच्या हस्ते एक लाख रुपयेचेधनादेशव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, सन्मान घेताना काठेवाडीचे सरपंच श्री सूर्यकांत गोपाळराव पोतुलवार ( तथा संचालक राधेगोपाल अग्रो फार्म, व संचालक राधेय सामाजिक संस्था काठेवाडी), व श्री प्रा.डॉ.बालाजी पोतुलवार( पीपल्स कॉलेज नांदेड), मोठे बंधू श्री चंद्रकांत पोतुलवार (वन परिक्षेत्र अधिकारी तथा नांदेड जिल्हा फिरते पथक प्रमुख वन विभाग नांदेड), तसेच मान्यवर श्री डी. पी. सावंत सर,जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अंबुलगेकर मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम, आमदार राजूरकर साहेब, आमदार हंबर्डे साहेब, आमदार कल्याणकर साहेब, जि. प.सभापती व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर साहेब तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.व सन्मानपञ देण्यात आला.