
दैनिक चालु वार्ता
मुक्ताईनगर प्रतिनिधी
सुमित शर्मा
मुक्ताईनगर ( जळगाव): जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाला कुऱ्हा येथे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मंगळवारी रात्री बारा वाजे नंतर अमोल वानखेडे यांच्या घरावर छापा टाकला. अमोल वानखेडे याने घराच्या गच्चीवर बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. संशयित अमोल वानखेडेयाने आपल्या घराच्या गच्चीवर हा कारखाना गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचा साथीदार अमोल वसंत भोई राहणार कुऱ्हा हा देखील सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धाड टाकल्यानंतर 37 हजाराच्या मुद्देमालासह एक आरोपी पकडण्यात आला असून दुसरा फरार आहे. मंगळवार ,रात्री दीड वाजेच्या सुमारास कुऱ्हा काकोडा येथे ही कारवाई करण्यात आली. Ipc धारा 328, धारा 420 व धारा 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक किरण धनगर, हवालदार दिपक पाटील, पोलीस नाईक प्रमोद लाड वंजारी, रवींद्र पाटील ,नंदलाल पाटील ,सचिन महाजन, अशोक पाटील तसेच कुऱ्हा दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माणिक निकम व कुऱ्हा येथील सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते