
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनीधी
रविंद्र पाडवी
भगदरी :- राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व माध्यमिक विद्यालय भगदरी यांच्या संयुक्त विद्यमाने भगदरी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सुरगनसिंग पाडवी बार्टी संस्थेचे समतादूत ब्रिजलाल पाडवी उपशिक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, नितीन मोगाल, समाधान कुवर,कैलास नागमल,शरदभाई पाटील, हिमत्त पाडवी आदिंच्या उपस्थित युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले, त्यावेळेच इ 10 वीचे विद्यार्थी उपस्थित होते.