
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
बेटमोगरा :- दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा बेटमोगरा नांदेड जिल्ह्यातील ही शाखा असून तेथील कामाची पद्धत कोणती आहे तेच कळले नाही शासनाने शेतकरी पीक विमा , पीक कर्ज, दुष्काळ अशा अनेक योजनांचे पैसे ह्या बँकेमध्ये टाकले जातात पण येथील कर्मचारी हे शेतकऱ्यांना अरेरावी ची भाषा बोलतात आणि शेतकरी रोज रोज ये जा करून आज या उद्या या हे कारण सांगतात आणि ओळख पाहून काम करतात अशी शेतकऱ्याचे सांगत आहेत.
येथील काही शेतकरी हे आठ दिवसांपासून परेशान आहेत ते मानतात की हे कर्मचारी हे एक चेरमन ५० लोकांचे पैसे एक व्यक्ती घेऊन जातो रोज ती व्यक्ती रोज रोज पैसे घेऊन जातो पण आमचा वयोवृध्द शेतकरी हे रोज ये जा करून वापस जातो.कर्मचारी बंद दाराआड काम करून देत आहेत असे अनेक शेतकरी दिवसभर उपवासी पोटाने पैसे मिळतील या आशेने सायंकाळ पर्यंत वाट पाहून घरी जातात तसेच रक्कम ठोक मध्ये दिली जाते दरवेळी वरचे पैसे दिले जातच नाहीत ही फार मोठी बँकेची घोड चूक तर होत नाही ना ह्या कडे कोणाचं लक्ष कधी जाईल व बँक कधी सुरळीत काम चालेल ही अपेक्षा सामान्य शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे