
दैनिक चालु वार्ता
प्रा. मिलिंद खरात
पालघर प्रतिनिधी
भिवंडी तालुका :- जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा, केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जन्मोत्सव 2022 निमित्त महिला सन्मान सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ व स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मगर व माजी ग्रामपंचायत सदस्या रेणुका जाधव यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून आरोग्य अधिकारी पडघा डाॅ.प्रज्ञा लोडकर यांनी दीप प्रज्वलन केले.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सहशिक्षिका दिलशाद शेख यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जिवन कार्या विषयी मार्गदर्शन करून प्रबोधनात्मक अभिवादन केले.उपस्थित महिला अँड.तनुजा गायकर, इंजिनिअर मोनिका फापे,त्रिषा फापे यांनी सावित्रीच्या ओवी व राजमाता जिजाऊ यांचा पोवाडा गायन करून कार्यक्रमात रंगत आणली व प्रबोधन कले.अंगणवाडी कार्यकर्ती मनिषा जाधव यांनी “फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का”? हे गीत सुंदर आवाज गायन करून प्रबोधन कले.
शाळेतील विद्यार्थीनीनी जिजाऊ वेशभूषा साकारली. उच्च शिक्षित मुली,महिला,महिला सरपंच,ग्रामपंचायत महिला सदस्या, महिला डाॅक्टर, आरोग्य सेविका,आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, शिक्षिका अशा 30 महिलांचा जिजाऊ सावित्री ची प्रतिमा,पेन, गुलाब पुष्प उपस्थित ग्रामपंचायत सरपंच छाया हरड,ग्रामपंचायत सदस्या रेश्मामगर,माजी ग्रामपंचायत सदस्या रेणुका जाधव, डाॅ.प्रज्ञा लोडकर यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
उपस्थित महिला अँड.तनुजा गायकर यांनी मनोगत मांडताना सांगितले कि,मुलींना उच्च शिक्षण दिले पाहिजे त्यांना त्यांचे करिअर करण्या साठी स्वातंत्र्य देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे.प्रत्येक महिलेने जिजाऊ व सावित्री यांची प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे.तसेच उपस्थित महिलांनी आजच्या दिवशी सन्मान सत्कार केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून जिजाऊ सावित्री याच आपल्या प्रेरणास्थान आहेत असे सांगितले.
संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार , सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या रेश्मा निवृत्ती मगर व माजी सदस्या रेणुका अशोक जाधव व ग्रामपंचायत डोहळेपाडा,यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच छाया हरड, ग्रामपंचायत सदस्या,रेश्मा मगर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा लोडकर, आरोग्य सेविका सुरेखा साळवे,माजी सदस्या रेणुका जाधव, अँड.तनुजा गायकर, इंजिनिअर मोनिका फापे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, उच्च शिक्षित महिला, ग्रामपंचायत सदस्या,आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्त्या ,मदतनीस,व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या