
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम अंतर्गत सिल्लोड येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान, उपचार, रक्तदान व महालसीकरण शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरात कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी आयोजकांच्या वतीने नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या शिबिराचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई साहेब यांच्याहस्ते संपन्न झाले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासह आमदार अंबादास दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, नगराध्यक्षा राजश्री निकम, नॅशनल सुतगीरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर पठाण, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहंमद हनिफ, दीपाली भवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.शिबिर यशस्वी होण्यासाठी शिवसेना, युवासेना, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, शिवसेना नगरसेवक, नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, धन्वंतरी मेडिकल व डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.