
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सूनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :-गंगापूर तालुक्यातील शेकटा येथे दिनांक 12 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली असून शिल्लेगाव पोलिसात पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस ठाणे शिल्लेगाव येथे फिर्याद दिल्यावरून रंजनाबाई पावशा चव्हाण (वय 48 वर्ष) व्यवसाय मजुरी रा. शेकटा ता.गंगापूर यांनी शिल्लेगाव पोलिसात फिर्याद दिली की यातील आरोपी नामे विशाल शेखनाथ कोळेकर रा. शेकटा ता गंगापूर याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हीस निर्जनस्थळी नेऊन तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला व झाला प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.
वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे गु र क्र 15/22, कलम 376(2)(n),506 भा द वि स ह कलम 4,8,12 पोक्सो व इतर प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. नमूद घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रकाश बेले उपविभागिय अधिकारी,पोलीस निरीक्षक श्री रवींद्र खांडेकर,पोलीस ठाणे शिल्लेगाव यांनी भेट दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करत आहेत.