
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- कोविड19चे प्रतिबंधात्मक नियमानुसार कार्यक्रम आयोजित केला. प्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एफ. शिरसाठ सर यांनी केले व ऑनलाईन विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या भारतीय संस्कृतीच्या प्रसार कार्याविषयी मार्गदर्शन केले. व जिजाऊंच्या लेकी म्हणून श्रीमती मीना पटेल व श्रीमती दीपाली निकम या शिक्षिकांचा सन्मान केला ,जिजाऊच्या स्वराज्य निर्मिती ची प्रेरणादायी विचार कसे होते याविषयी पर्यवेक्षक श्री. पी. व्ही. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ऑनलाईन कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे व श्री एस जे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री एस आर देसले आभार श्री व्ही एस ईशी यांनी केले कार्यक्रमाला सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ऑनलाईन हजर होते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूनचे सहकार्य लाभले.